Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजमहाराष्ट्र नेमका कोण्या वाटेने? अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डलचे बिंग फुटले..! तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं...

महाराष्ट्र नेमका कोण्या वाटेने? अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डलचे बिंग फुटले..! तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग; गतीमंद मुलीवरही..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सातारा : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसून येत आहे. कोलकाता प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना राज्यात बदलापूर प्रकरणाने एकच संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता साताऱ्यातील आश्रमात मुलींना वेश्या व्यावसाय करण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आश्रमचालक महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. साताऱ्यातील कराडमधील टेंबू गावातील अनाथ आश्रमात ही घटना घडली आहे. याप्रकरणात आरोपींना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक बांधिलकीच्या नावाआड अनाथाश्रमात सुरू असलेला धक्कादायक प्रकार उघड झालाय हे. याप्रकरणी आश्रमचालक आणि त्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. कराड येथील टेंबू या भागात हा सर्व प्रकार घडत असल्याचं आता समोर आलं आहे. एका युवतीच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघड झाला असून अनेक मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे.

मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडले जात होते..

सातारा कराड येथील टेंबू गाव. या गावातील आई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निराधार आश्रम या नावाखाली रेखा सकट नावाची महिला हे अनाथाश्रम चालवत असल्याची माहिती मिळत आहे. या अनाथ आश्रमामध्ये अनेक अनाथ मुलींची, अनाथ महिलांची भरती केली जात होती. मात्र रेखा नावाच्या या महिलेकडून अनाथाश्रमामध्ये आलेल्या मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचं आता उघड झाले आहे.

सातारा जिल्ह्यात राहणाऱ्या एका अनाथ युवतीनं या घटनेला वाचा फोडली. तिनं कराड पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची सर्व माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रेखा सकट आणि तिचा प्रियकर वाल्मिकी माने या दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघा आरोपींना कराड येथील न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतर कोणीही तक्रार देण्यास पुढे नाही..

अनाथाश्रमात आलेल्या अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचं तक्रारदार मुलीकडून सांगितलं जात आहे. सध्या तरी ही तक्रारदार मुलगी पुढे आले आहे. मात्र अद्याप इतर कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेलं नाही. या घटनेशी निगडीत असलेल्या अनेक व्हिडीओ, ऑडिओ क्लिप या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी रेखा सकट ही अनाथाश्रमातील मुलांकडून स्वतःचे पाय दाबून घेण्यापासून ते घरातील सर्व कामं करुन घेत असल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर ज्या मुली सांगितलेलं काम ऐकत नाहीत, अशा मुलींना ती लोखंडी पट्टीनं मारत असल्याचंही एका व्हिडीओमधन समोर आलं आहे.

गतीमंद मुलीवर झालेल्या आत्याचाराची सेटलमेंट..

एका ऑडिओ क्लीपमध्ये तर आश्रमात आलेल्या एका गतीमंद मुलीवर झालेल्या आत्याचाराची सेटलमेंट करण्यासाठी चक्क पैशाची देवाणघेवाण झाल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. सध्या पोलिसांनी एका फिर्यादी मुलीवरून याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments