इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे): हवेली तालुक्यातील पेठया छोट्याश्या गावात श्री काळभैरवनाथ यात्रेच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने हरियाणा केसरी, नॅशनल चॅम्पियन भुपेंद्र सिंग याला एका डावातच चितपट करून श्री काळभैरवनाथ केसरीचा किताब पटकावला. पेठ उत्सव समितीतर्फे दहा लाखांच्या आसपास कुस्त्यांचे शनिवारी (ता. 17) आयोजन करण्यात आले होते.
सदरील कुस्ती व ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ केसरी मानाची गदा युवा उद्योजक सुजित चौधरी व मित्र परिवाराने दिली होती. गदा व रोख रक्कम असे या बक्षिसाचे स्वरूप होते. या कुस्ती स्पर्धेसाठी 3 महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, विविध पुरस्कार विजेते, अशा पैलवानांची मांदियाळी पेठ या गावात जमली होती. सोरतापवाडीचे माजी उपसरपंच पै. निलेश खटाटे, व सुहास खुटवट, भरत म्हस्के, सचिन आव्हाळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
पेठ (ता. हवेली) येथे शुक्रवारी (ता. 14) व शनिवारी (ता. 15) या दोन दिवसात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव पार पडला. शुक्रवारी संध्याकाळी छबिना व ढोल लेझीम कार्यक्रम पार पडला. तर शनिवारी सकाळी व रात्री 9 वाजता लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.
पेठ येथील कुस्ती आखाड्यामध्ये तालुक्यासह राज्यातील अनेक कुस्ती मल्ल व कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये पाच हजारापासून ते एक लाख 11 हजार रुपयांपर्यंत बक्षिसे व मानाच्या गदा अशी बक्षिसांची बरसात करण्यात आली होती. संयोजकांसमवेत केलेले आखाड्याचे सुरेख नियोजन, सर्व प्रेक्षकांना व्यवस्थित कुस्त्या पाहाता याव्यात म्हणून केलेली बैठक व्यवस्था व डिजिटल स्क्रीनची सोय आणि प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान, प्रचंड उत्कंठा, टाळ्या अन् हलग्यांच्या आवाजाने गजबजलेल्या प्रेक्षकांची उपस्थिती यामुळे निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा हे यावर्षीच्या श्री काळभैरवनाथ यात्रेचे वैशिष्ठ ठरले.
शनिवारी दुपारनंतर झालेल्या आखाड्यात हरियाणा कैसरी, नॅशनल चॅम्पियन भुपेंद्र सिंग यांच्यात एक लाख आकरा हजार एकशे अकरा रूपयांची झालेले लढतीत पृथ्वीराज पाटील यांनी हा विजय मिळवला. तर आखाड्यात उतरले तीन महाराष्ट्र केसरी व हरियाणा केसरी त्यामुळे आखाड्याची उत्सुकता शिगेला पोचली होती. एक लाख आकरा हजार एकशे अकरा रूपयांची शेवटच्या दोन कुस्त्या झाल्या. महाराष्ट्र केसरी बाळा रफिक शेख विरूद्ध हर्षवर्धन सदगीर या लढतीत रफिक शेख विजयी झाला.
दरम्यान, या स्पर्धेसाठी शिरूर हवेली तालुका ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी भेट देऊन आखाड्याचे कौतुक केले. तसेच भविष्यात आखाड्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी दिलीप वाल्हेकर, गुलाब चौधरी, माजी सरपंच सुरज चौधरी, दादा सातव, पोलिस पाटील दत्तात्रय चौधरी, बाप्पुसाहेब चौधरी, राजेंद्र आढाव, बाबुराव गायकवाड, काळुराम चौधरी, सोमनाथ चौधरी, राजेंद्र चौधरी, दिपक चौधरी, निखील चौधरी, रघुनाथ चौधरी, गणेश गायकवाड, आकाश आढाव, संजय नाना चौधरी, सुजित हाके, राकेश चौधरी, प्रतिक चौधरी, श्रीकांत चौधरी, मारुती चौधरी तसेच नायगाव, पेठ, सोरतापवाडीसह परिसरातील नागरिकांनी कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.