Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज महाराष्ट्रावरही कोरोनाचं संकट, केरळनंतर आता या राज्यांमध्ये आढळला नवा JN.1 व्हेरिएंट

महाराष्ट्रावरही कोरोनाचं संकट, केरळनंतर आता या राज्यांमध्ये आढळला नवा JN.1 व्हेरिएंट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

Covid 19 Update: हिवाळा सुरु होताच देशात कोरोनाचं संकट देखील वाढू लागले आहे. कोरोनाचा नवा प्रकार JN.1 चे रुग्ण आता भारतात देखील आढळू लागले आहेत. हा प्रकार अनेक देशांमध्ये झपाट्याने पसरत आहे. 8 डिसेंबर रोजी देशात पहिले प्रकरण नोंदवले गेले होते, परंतु आता त्याची सक्रिय प्रकरणे 2000 च्या जवळ पोहोचली आहेत. या कोरोना प्रकाराबाबत सरकारने सर्व राज्य सरकारांना आधीच अलर्ट केले आहे.

केरळ नंतर आता महाराष्ट्र आणि गोव्यात देखील प्रकरणे आढळून आले आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन आधी ही चिंतेची बाब आहे. बरेच लोक या दरम्यान फिरण्यासाठी जातात. नवीन वर्षाच्या पार्थ्यांसाठी लोक गोव्याकडे जातात. अशा परिस्थितीत कोरोनाचा रुग्ण येथे आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

पर्यटकांना सावधगिरीचा इशारा

नवीन वर्षाच्या पार्टीसाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पर्यटकांना मास्क घालण्याच्या, सामाजिक अंतर पाळण्याचे आणि लसीकरण करण्याचा सल्ला दिला जात आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अशा सूचना दिल्या जात आहे.

पर्यटकांना सॅनिटायझर आणि मास्क सोबत बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. वारंवार हात चांगले धुवावेत. पार्टीला जाण्यापूर्वी तब्येतीची तपासणी करावी अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पर्यटकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असे सरकारने म्हटले आहे.

उत्तराखंडमध्येही अलर्ट

कोरोनाच्या नवीन प्रकारांचा वाढता धोका पाहता उत्तराखंड सरकार सतर्क झाले आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हे आणि रुग्णालयांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. देशभरात वेगाने वाढणारी प्रकरणे समोर आल्यानंतर उत्तराखंड संभाव्य उद्रेकाला तोंड देण्याची तयारी करत आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments