Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज महाराष्ट्रानंतर आता या राज्यातही दोन उपमुख्यमंत्री, भाजपचा मोठा निर्णय

महाराष्ट्रानंतर आता या राज्यातही दोन उपमुख्यमंत्री, भाजपचा मोठा निर्णय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

MP New CM : मध्य प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजया

मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता यावरील सस्पेंस अखेर संपला आहे. कारण भारतीय जनता पक्षाने सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. मोहन यादव हे मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार

उज्जैन दक्षिण मतदारसंघातून मोहन यादव यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांचा बारा हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे. मोहन यादव यांना 95,699 मते तर चेतन प्रेमनारायण यादव यांना 82,758 मते मिळाली आहेत. मोहन यादव हे आरएसएसच्या जवळचे मानले जातात. 2013 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. यादव हे शिवराज सिंह सरकारमध्ये शिक्षणमंत्रीही होते.

दोन उपमुख्यमंत्री

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. जगदीश देवरा आणि राजेश शुक्ला हे उपमुख्यमंत्री असतील. त्याचवेळी नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

राज्यात दणदणीत विजयानंतर भाजपने मनोहर लाल खट्टर, डॉ. के लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांना निरीक्षक म्हणून पाठवले होते. या तीन नेत्यांकडे मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी देण्यात आली होती. सर्व निरीक्षकांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षाची बैठक झाली, त्यात मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.

मोहन यादव यांचं उज्जैन हेच जन्मस्थान

मोहन यादव यांचा जन्म २५ मार्च १९६५ रोजी उज्जैन येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पूनमचंद यादव आहे. तीन वेळा आमदार राहिलेले यादव यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांनी राज्यशास्त्रात B.Sc., LLB., M.A., M.B.A आणि Ph.D केले आहे.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments