Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजमहाराष्ट्रातल्या माजलेल्या वळूनां कात्रजचा घाट दाखवू

महाराष्ट्रातल्या माजलेल्या वळूनां कात्रजचा घाट दाखवू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कात्रज, (पुणे) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. महिलांची संख्या देखील लक्षनीय होती. यावेळी जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, महाराष्ट्रात मराठे एक नाहीत असे ज्यांनी हीनवले त्यांना पुणेकरांनी दाखवून दिले त्यांची पाठ थोपटायला हवी. दोन चार दिवसापूर्वी आपल्या समाजाला खूप हिनवलं, पण पुणेकरांनी एकजूट दाखवून दिली आहे. आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या मागे हटू नका मी हटत नाही अशीच एकजूट दाखवा, मला यांनी घेरायचं ठरवलं आहे, पण छाताडावर पाय ठेऊन पुढे जाऊ, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले, मुंबईतल्या बऱ्याच जणांना माज आलाय, तो माज उतरवयाचे औषध मराठ्यांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे-जेवढे माजलेले वळू आहेत. त्यांना कात्रजचा घाट दाखवू, तुमची लेकरं मोठी व्हावीत एवढाच माझा पण आहे. माझा जीव गेला तरी मी मागे हटत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मी पुण्यातील समाजाचा आभार मानतो, आरक्षणाच्या लढ्यामध्ये माझ्यासोबत ते राहिले. ही लढाई माझी एकट्याची नसून सर्व समाजाची आहे आणि मी समाजासोबत शेवटपर्यंत राहणार आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments