Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजमहाराष्ट्राची मान शरमेने खाली...! खाऊसाठी पैसे देण्याच्या आमिषाने लैंगिक अत्याचार; 67 वर्षीय...

महाराष्ट्राची मान शरमेने खाली…! खाऊसाठी पैसे देण्याच्या आमिषाने लैंगिक अत्याचार; 67 वर्षीय व्यक्तीचे विकृत कृत्य

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्यात सतत घडणाऱ्या अत्याराच्या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. पुण्यात पुन्हा एक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. 11 वर्षीय चिमुकलीवर एका 67 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे पुणे जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. खाऊसाठी पैसे देण्याच्या आमिषाने नराधमाने हे विकृत कृत्य केले आहे.

हि घटना २३ ऑगस्ट रोजी खडकवासला परिसरात घडली आहे. या प्रकरणी हवेली पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. दिलीप नामदेव मते (वय-67 वर्षे, रा. खडकवासला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकवासला परिसरात इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका विकृत नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. खाऊसाठी पैसे देण्याच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खडकवासला परिसरात घडली आहे.

दरम्यान, आरोपीने खाऊसाठी पैसे देतो असे सांगून घरात घेऊन जात अत्याचार केल्याचे पीडित मुलीने सांगितले आहे. यानंतर मुलीने घडलेल्या घटनेविषयी पालकांना सांगितले असता त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात पालकांच्या तक्रारीवरून या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुत्रे हलवली आहेत. पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments