Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज महाराष्ट्राची एकसंधता विखुरण्यासाठी जातीच राजकारण चालवलं जातंय; राज ठाकरेंची टीका

महाराष्ट्राची एकसंधता विखुरण्यासाठी जातीच राजकारण चालवलं जातंय; राज ठाकरेंची टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

चिंचवड : आज जाती-पातीच राजकारण जे चालत आहे, ते स्वतःहून चालत नाही आहे. ते चालवले जात आहे, महाराष्ट्र एक संघ राहू नये, याच्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत आणि आपणं गाफील आहोत. काही नेते सगळं घडवून आणत आहे, एकत्रीकरण विसरून टाकण्याचे काम केले जात आहे, अशी टीका मनसेचे राज ठाकरे यांनी चिंचवड येथे केली.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली. प्रसिद्ध नाटककार आणि अर्थतज्ञ डॉ. दीपक करंजकर यांनी नाटक आणि मी या विषयावर ठाकरे यांची मुलाखत घेतली. नाट्य संस्कृती, सध्या सुरू असणाऱ्या जातीपातीचे राजकारण, कलावंतांचा सन्मान, आवडणार नाटक, कलाभान जपण्याची गरज आहे, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.

एकेमकाना आद्या पाद्या अंड्या अशा हाका मारू नका!

नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावर राज ठाकरे काही कलावंतांचे कान टोचले. ठाकरे म्हणाले, बाहेरच्या राज्यातील कलावंत पाहतो आणि आपल्या कलावंता मध्ये काही फरक आहेत. एकमेकांना मान दिला नाही, एकेमकाना आद्या पाद्या अंड्या अशा हाका मारू नका. रजनीकांत आणि इलाही राजा एकत्र बसून दारू पीत असतील, पण सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना खूप सन्मान देतात.”

ठाकरे म्हणाले, शरद पवार आता समोर आले, तर मी त्यांना वाकून नमस्कार करीन, कारण ते एक बुजुर्ग नेता आहेत व्यासपिठावर काय बोलेन! हा भाग वेगळा सन्मान द्यावा लागतो.”

आपण पुढे कधी जाणार

राज ठाकरे म्हणाले, गेली ७० वर्ष माझा आजोबा, काका हेच म्हणायचे. मी तेच म्हणतोय. विज पाणी रस्ते तीच आश्वासने दिली जात आहेत. आम्ही पुढे कधी जाणार. मला निवडणुका लढवताना आता लाज वाटते.

जमीन चलाखीने विकत घेतली जातीय!

ठाकरे म्हणाले, मी बोलत राहणार, सतत बोलत राहणार मराठी माणसाला जागं करत राहणार आहे. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे, जमीन चलाखीने विकत घेतली जातीय. शिवडी-न्हावाशेवा रस्ता होईल तर रायगड जिल्हा बरबाद होईल.’

सुशिक्षितांनी राजकारणात यायला हवे!

ठाकरे म्हणाले, मध्यमवर्गीयांना राजकरणात आणि समाजकारनात यावं लागेल. केवळ सुशिक्षत होऊन चालणार नाहीत तर सुज्ञ असावे लागेल. बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या मात्र त्या सुज्ञ होत्या तुमची जमीन म्हणजे तुमचं अस्तित्व, जमीन गेली भाषा गेली तर कोण तुम्ही ?”

मतदारांनी चुकाना चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला हव, जे चुकले ते त्यांना घरी बसवा !

नाट्य क्षेत्र समृध्द करण्यासाठी मी पुढाकार घेईल राजकरण्याना सांगेन तुम्ही एकत्र तर या. आपल्या बलस्थानामध्ये नाट्य क्षेत्र प्रथम हे समजून घ्या हे वाढवायला हवं, हे नाही करणार तर उपयोग काय ? महाराष्ट्राने पुन्हा एकदा मोठा विचार केला पाहिजे. शिक्षा देत नाही तोपर्यंत सुधारणा होत नाही, मतदारांनी चुकाना चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला हव, जे चुकले ते त्यांना घरी बसवा.”

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments