Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजमहायुतीला धक्का ! समरजित घाटगे शरद पवार गटात करणार प्रवेश; पक्षप्रवेशाची तारीखही...

महायुतीला धक्का ! समरजित घाटगे शरद पवार गटात करणार प्रवेश; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणूकांचे वारे वाहत असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असून मतदारसंघासोबतच उमेदवारांची चाचपणी सुद्धा होत आहे. अनेक बैठका पार पडत आहे. अशातच आता महायुतीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असणाऱ्या समरजित घाटगे यांनी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणारा असल्याचा निर्णय घेतला आहे.

3 सप्टेंबर रोजी कागलमधील गैबी चौक येथे ते शरद पवार, सुप्रिया सुळे, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महायुतीला हा मोठा धक्का मानला जात असल्याचं बोललं जात असून विद्यमान मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विधासभा निवडणुकीतील अडचणीत वाढ झाली आहे.

कार्यकर्त्यांची मतं आजमावून ते निर्णय घेणार..

उद्या कागल शाहू सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून यावेळी कार्यकर्त्यांची मतं आजमावून ते निर्णय घेणार आहेत. समरजीत सिंह घाटगे यांच्या ट्विटर अकाउंट वरून भाजपचं कमळ चिन्ह गायब झालं आहे. तसंच महायुती सरकारच्या कोल्हापुरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संमारंभालाही समरजीत सिंह घाटगे उपस्थित राहिले नव्हते. खुद्द देवेंद्र फडणवीस या कार्यक्रात उपस्थित होते. तरीही घाटगे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यांचं पवार गटासोबत जाणं निश्चित मानलं जात होतं.

3 सप्टेंबर रोजी करणार पक्षप्रवेश..

समरजीत सिंह घाटगे 3 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा पक्षप्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे कागलमधील नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटर्तीय समरजितसिंह घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात विधासभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला असल्याचे चित्र होते. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढविणार असल्याचा त्यांनी निर्धार केला होता. शरद पवार गटातून निवडणूक लढण्याच्या चर्चा होत असताना काल खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आलं नाही.

तुमच्या विरोधात निवडणूक लढवणारच..: समरजित सिंह घाटगे

जगातली सगळी ताकद तुमच्यासोबत आली तरी तुमच्या विरोधात निवडणूक लढवणारच, असा इशारा समरजित सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला होता. त्यामुळे कागलमध्ये महायुतीत बंडाला सुरुवात झाल्याची चीन्ह बघायला मिळाली होती. समरजितसिंह घाटगे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात, मात्र मुश्रीफ विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे घाडगे अपक्ष किंवा शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्याची शक्यता बळावली होती. अखेर आता ३ तारखेला ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments