Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजमहापालिका पाटबंधारेला देणार १०० कोटी

महापालिका पाटबंधारेला देणार १०० कोटी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला पाठवलेल्या पाणीपट्टीच्या बिलावरून वाद सुरु आहे. त्यावर अंतिम तोडगा अद्याप निघालेला नाही. पण पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महापालिकेने पाटबंधारे विभागाला १०० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. यासाठी १५ कोटीची तरतूद उपलब्ध असून, ८५ कोटी रुपये वर्गीकरण केले जाणार आहेत.

पाटबंधारे विभागाकडून पुणे महापालिकेला १३ टीएमसीच्या जवळपास पाणी कोटा मंजूर आहे. या कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरल्यानंतर त्यावर दंड आकारला जातो. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत. पुण्यात निवासी व व्यावसायिक कारणासाठी पाणी वापर केला जात असला तरी पाटबंधारे विभागाने शहरात औद्योगीक कारणासाठी पाणी वापर केला जात असल्याने कारण देत वाढीव रकमेचे बिल पाठवले आहे. महापालिकेने त्यामुले बिल भरण्यास नकार दिल्याने या दोन्ही संस्थांमध्ये पत्रव्यवहारातून वाद सुरु आहे. पण त्यावर तोडगा निघालेला नाही.

मार्च २०१६ ते सप्टेंबर २०२३ कालावधीतील पुणे महापालिकेचे पाण्याचे नियमीत बिल ६९७ कोटी असून, दंडाची रक्कम ४०४ कोटी आहे. या एकूण ११०३ कोटी पैकी महापालिकेने ४९२ कोटी रुपये भरले आहेत. पण पाणीपट्टीच्या दरावरून वाद सुरु असल्याने पुढील पैसे न भरल्याने महापालिकेची ६१० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच कालवा समितीची बैठक घेतली, त्यामध्ये महापालिकेने १०० कोटी रुपये पाटबंधारे विभागाला द्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. पाणी पुरवठा विभागाकडे १५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असून, ८५ कोटी रुपये वर्गीकरण करून उपलब्ध केले जाणार आहेत. त्यानुसार १०० कोटी रुपये पाटबंधारेला देण्याचा प्रस्ताव आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments