इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
अमरावती : अमरावतीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अमरावतीमधील एका आश्रमात १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मठात १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. रिद्धपूर ही महानुभाव पंथीयाची काशी म्हणून ओळखली जाते. यात मठात गेल्या अनेक महिन्यांपासून युवतीवर अत्याचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
सुरेंद्र आणि बाळासाहेब या दोघांनी मावशीच्या साथीने अल्पवयीन मुलीला बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. या अत्याचारातून पीडित मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिली आहे. या अत्याचाराची माहिती पीडितेच्या मावशीला देण्यात अली. मात्र, मावशीने पीडित तरुणीला गप्प राहण्यास सांगितले. या प्रकरणी शिरखेड पोलिसांकडून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिघांवर बलात्काराच्या गुन्ह्यासह पोस्कोचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.