Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमहादेव बेटिंग अॅप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: नारायणगाव परिसरात प्रोसेसिंग...

महादेव बेटिंग अॅप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: नारायणगाव परिसरात प्रोसेसिंग युनिटवर छापा, 70 जण ताब्यात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

देश विदेशातील गुंतवणुकदारांपर्यंत चर्चेत असलेले महादेव बेटिंग गैरव्यवहाराचे धागेदोरे पुणे-नाशिक रस्त्यावरील नारायणगाव येथपर्यंत येऊन पोहचले अाहे. पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) नारायणगाव मध्ये मोठी छापेमारी करत, महादेव बेटिंग अॅपच्या प्रोसेसिंग युनिटचा पर्दाफाश केला अाहे. याप्रकरणी एका व्यवसायिकाचे घरातील दोन प्रमुख संशयितांसह ७० जणांना चौकशीसाठी पोलीसानंची ताब्यात घेतले अाहे.

महादेव बुक अॅपचा संस्थापक सौरभ चंद्राकर याने त्याचा मित्र रवी उप्पल याच्यासोबत महादेव अॉनलाइन बेटिंग अॅप सुरु केले. यामाध्यमातून बेटिंगद्वारे गुंतवणुकदार कोट्यावधी रुपयांची अार्थिक उलाढाल करु लागले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये अॅपचा मालक सौरभ चंद्रकार याने संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये थाटामाटात विवाह केला व त्यास अनेक प्रतिष्ठीतां सोबत कलाकरांची देखील हजेरी होती. त्यामुळे हे लग्न ईडीच्या रडावर येऊन त्यांनी सखोल तपास केला असता, मनी लॉड्रिगंचा घोटाळा उघडकीस अाला. याप्रकरणात ईडीने काही बॉलीवूड कलाकारांना देखील समन्स बजावून चौकशीसाठी हजर रहाण्यास सांगितले. अारोपींनी महोदव बुक अॅपसह इतर वेगवेगळे अॅप काढून त्यामाध्यमातून कोट्यावधी रुपयांची जमवाजमव करुन विविध मालमत्ता खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, नारायणगाव येथे महादेव अॉनलाईन बेटिंग अॅपचे अनुषंगाने अाम्ही कारवाई केली अाहे. सदर ठिकाणी एका इमारतीत प्रोसेसिंग युनिट असल्याचे दिसून अाले अाहे. याबाबत चौकशी करण्यासाठी काहीजणांना अाम्ही ताब्यात घेतले अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments