Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजमहात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची निवड

महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची निवड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड : खानवडी (ता. पुरंदर) येथे होणा-या सतराव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक न्यायाधीश वसंतराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष पदी रवींद्र फुले तर निमंत्रक पदी छायाताई नानगुडे व सुनील धिवार यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन २८ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

महात्मा फुले यांच्या मूळ खानवडीमध्ये दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात ग्रंथदिडी, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कवी प्रकाश घोडके उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, माजी आमदार संभाजीराव कुंजीर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे आदी उपस्थित राहणार आहेत.

वसंतराव पाटील हे साहित्य क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करीत असून न्यायपालिकेत न्यायधीश म्हणून सेवा करीत साहित्यात वेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे. शेकडो कविसंमेलने त्यांनी केली आहेत. मूळचे नाशिक जिल्ह्यातील असून मुंबईत जलद गती न्यायालयात न्यायधीश म्हणून त्यांनी काम केले आहे.

यापूर्वी झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा.म. देशमुख, म.भा.चव्हाण, प्रा. गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डाँ सय्यद जब्बार पटेल, डाँ जयप्रकाश घुमटकर, दशरथ यादव, हरीश मेश्राम, भा.ल. ठाणगे, रावसाहेब पवार, डॉ स्वाती शिंदे, अविनाश ठाकरे, यांनी भुषविले आहे. साहित्य संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, दत्ता होले, चंद्रकांत फुले, रमेश बोरावके, दिपक पवार, संजय सोनवणे आदी करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments