इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दिल्ली : भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी लोकसभेत प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबतचा उल्लेख करतं म्हटले की, या चेंगराचेंगरीत षडयंत्राचा वास येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शरमेने मान खाली घालावी लागणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावरील चर्चेत भाग घेत त्यांनी हे विधान कले आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावरील चर्चेत भाग घेत, बिहारमधील पाटणा साहीबचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, आतापर्यंत 35 कोटी लोकांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केले आहे. त्यांनी म्हटले की, महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा तपास सुरू असून सत्य लवकरच समोर येणार आहे.
रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला ते म्हणाले की, कुंभ आणि सनातनचे नाव ऐकताच यांना त्रास का सुरू होतो? परंतु मी एक गोष्ट या सभागृहात स्पष्ट करू इच्छितो की, भारत सनातनचा अपमान सहन करणार नाही. हजारो वर्षांमध्ये तर कोणी सनातनला कमकुवत करू शकले नाहीत, तर ही लोकं कोण आहेत?
तसेच प्रसाद यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर सोनिया गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, संविधान वाचवण्याचा दावा करणाऱ्यांनी सर्वोच्च घटनात्मक पदाचा सन्मान करणं शिकायला पाहीजे. तसेच ते असही म्हटले की, सर्वोच्च संविधानिक पदाचा अपमान करणं ही काँग्रेसची परंपरा असून त्यांच्या राजकारणाच्या डीएनएत ते आहे.
प्रसाद पुढे हेही म्हटले की, काँग्रेस सरकारच्या काळामध्ये भारत पाच सर्वात कमकुवत अर्थव्यवस्थांपैकी एक देश होता. मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारमध्ये भारताची अर्थव्यवस्था अतिशय बळकट झाली असून ती जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.