Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजमसालेदार पदार्थात लिंबूचा वापर टाळाच; छातीत जळजळ, अपचनही होऊ शकतं...

मसालेदार पदार्थात लिंबूचा वापर टाळाच; छातीत जळजळ, अपचनही होऊ शकतं…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यात लिंबू आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. ‘व्हिटॅमिन सी’ने समृद्ध असलेले हे आंबट फळ केवळ प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करत नाही तर पचनसंस्था देखील निरोगी ठेवते. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पितात, तर काहीजण जेवणाची चव वाढवण्यासाठी याचा वापर करतात. मात्र, लिंबूचा वापर योग्यप्रकारे करणे गरजेचे आहे.

काही पदार्थांसोबत लिंबूचा समावेश केल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होतात हे तुम्हाला माहिती आहे का? काही फूड कॉम्बिनेशन्स आहेत, जे लिंबू सोबत खाल्ल्यास पोटाची समस्या, ऍसिडिटी आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात. प्रत्येक पदार्थांचा वेगवेगळा गुणधर्म असू शकतो. काही पदार्थ थंड तर काही पदार्थ गरम गुणधर्माच्या असतात. त्यात लिंबूसोबत काही गोष्टींचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या जसे की गॅस, अॅसिडिटी, उलट्या किंवा पेटके होऊ शकतात.

तुम्ही लिंबू आणि दूध कधीही एकत्र घेऊ नका. कारण, लिंबूमध्ये असलेले ऍसिड दुधातील प्रोटीन काढून टाकते, त्यामुळे दुधाचे सत्त्व निघून जातात. यामुळे पोटात जळजळ, गॅस, अॅसिडीटी आणि जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. लिंबूसोबत दूध विशेषतः रिकाम्या पोटी सेवन केल्याने पचनक्रिया कमजोर होऊ शकते. तसेच लोक सलाडमध्ये काकडी आणि लिंबू एकत्र खातात, परंतु हे आरोग्यासाठी चांगले नाही. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, तर लिंबूमध्ये आम्ल असते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या वाढते.

इतकेच नाहीतर जर तुम्ही खूप मसालेदार अन्न खाल्ले असेल तर त्यात लिंबू घालणे टाळा. लिंबाचा आंबटपणा आणि मसाल्यांच्या गरम गुणधर्मामुळे छातीत जळजळ, अपचन आणि ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतात. लिंबूसोबत गाजर खाणेही हानिकारक ठरू शकते. गाजरांमध्ये काही घटक असतात जे लिंबू ऍसिडवर प्रतिक्रिया देऊ शकतात. यामुळे पोटात पेटके, गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments