Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमविआचे तिन्ही उमेदवार एकाच वेळी अर्ज भरणारः 18 एप्रिल रोजी महायुती...

मविआचे तिन्ही उमेदवार एकाच वेळी अर्ज भरणारः 18 एप्रिल रोजी महायुती आणि महाविकास आघाडीचे पुण्यात शक्ती प्रदर्शन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

महाविकास आघाडीचे उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉ. अमोल कोल्हे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर हे तिन्ही उमेदवार गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तर, महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार देखील मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर रास्ता पेठेतील हॉटेल शांताई समोर महाविकास आघाडीची भव्य सभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फटके हे दिग्गज नेते पुण्यातून विजयाचे रणशिंग फुंकणार आहेत.

महायुतीचे देखील शक्ती प्रदर्शन

यंदाची बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वर्चस्वाची ही लढाई मानली जात आहे. सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महायुती मधील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments