इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात डॉ. नीलम गो-हे यांनी केलेल्या व्यक्तव्याचे पडसाद आता पुण्यातही उमटू लागले आहेत. दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. दिल्लीतील या संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमामध्ये “ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं”, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले आहे. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यानंतर पुण्यातील नीलम गोन्हे यांच्या निवस्थानाबाहेर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळत आहे. त्यांनी घरासमोरच आंदोलन केलं आहे. या आंदोलनात महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
महिला आघाडीच्या नेत्या रेखा कोंडे म्हणाल्या..
आंदोलना वेळी महिला आघाडीच्या नेत्या रेखा कोंडे म्हणाल्या, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी नीलम गो-हे यांना विधान परिषदेवर सलग चार वेळा पाठविले आहे. नीलम गो-हे यांना पक्षाने सर्व काही दिले, मात्र त्या शेवटी गद्दार गटात गेल्या पण त्यापुढे जाऊन नीलम गो-हे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या बद्दल जे विधान केलं आहे आम्ही त्याचा निषेध व्यक्त करीत आहोत. नीलम गोन्हे यांनी नाक घासून माफी मागावी, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.