इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या पेटला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. मनोज जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होत आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीची पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती घोषणा करणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
यवतमाळमध्ये आज शासन आपल्यादारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल आहे. या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरला काळं फासण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पोस्टर्सला काळं फासण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला जाण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात ही बैठक बोलावली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री काय घोषणा करणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवलीय. जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर त्यांच्या प्रकृतीनंतर मुख्यमंत्री महाराष्ट्राला काय आवाहन करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
उपसमितीच्या बैठकीतून काय अपेक्षा
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेतील आवश्यक पुराव्यांच्या तपासणीबाबत चर्चा या बैठकीत अपेक्षित आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेण्यात येईल. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ नेमण्याबाबत चर्चा या बैठकीत होऊ शकते.
मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशात तातडीने आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी मराठा समाज करत आहे. अशातच आता ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे. गावखेड्यापासून राजधानी दिल्लीपर्यंत आंदोलनं उपोषण केलं जात आहे.