Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज मराठा आंदोलनाचा सिनेस्टाईल थरार, सरपंचाने जाळली स्वतःची नवी कार

मराठा आंदोलनाचा सिनेस्टाईल थरार, सरपंचाने जाळली स्वतःची नवी कार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

संभाजीनगर – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, गोळीबार केला. त्यामुळे राज्यभरातील वातावरण तापलेले असून अनेक ठिकाणी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी एकत्र येत मोर्चे काढले आहेत. तर, आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी आपला मोर्चे आंदोलकांकडे वळवला आहे. दुसरीकडे अनेक जिल्ह्यांत बंदची हाक देण्यात आली असून आंदोलक एकत्र येत राज्य सरकारचा निषेध नोंदवत आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात एका सरपंचाने स्वत:ची नवी गाडी जाळून घटनेचा निषेध व्यक्त केला.

जालन्यातील आंदोलनस्थळी जाऊन छत्रपती संभाजीराजेंनी सकाळीच आंदोलकांची भेट घेतली आणि गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आव्हान दिले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही काहीवेळापूर्वी मुंबईहून जालन्याला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार आहेत. हे दोन्ही नेते जालन्याला जात आंदोलन स्थळी आणि जखमी आंदोलकांची भेट घेणार आहेत. आंदोलनात राजकीय नेत्यांचा सहभाग वाढला असला तरी ठिकठिकाणी मराठा समाज एकत्र येत आक्रमक भूमिका घेत आहेत. संभाजीनगरमधील एका सरपंचाने स्वत:ची कार जाळून निषेध नोंदवला आहे.

विहिर मंजूर करण्यासाठी लाच मागितल्यानंतर पैशांची उधळण करणाऱ्या फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी आता पुन्हा एकदा हटके आंदोलन केले आहे. मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वीच घेतलेली नवी चारचाकी पेट्रोल टाकून जाळून टाकली. मराठा आंदोकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध करत करत त्यांनी फुलंब्रीतील पाल फाटा येथे ही कार जाळत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी मंगेश साबळे यांच्यासोबत काही मराठा आंदोलकही होते

आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही स्वतःची गाडी जाळली, पुढे आम्ही स्वत:ला जाळून घेऊन निषेध व्यक्त करू, ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर सरकारने दोन दिवसांत कारवाई करावी, अन्यथा आम्ही स्वतला जाळून घेऊ, असा इशाराही सरपंच साबळे यांनी दिला आहे.

पंचायतीसमोर उधळल्या होत्या नोटा

फुलंब्री पंचायत समितीसमोर याच सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला होता. याचा व्हीडिओ राज्यभर व्हायरल झाला होता. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, विहिरींना मंजुऱ्या न देणे, यामुळे वैतागून आपण दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचं मंगेश साबळे यांनी सांगितलं होतं.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments