इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नाशिक | 14 ऑक्टोबर 2023 : जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनाज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेतून मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी यल्गार पुकारला. या सभेतील भाषणातून मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. याला आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी जुने काही दाखले दिलेत. ओबीसी आणि मराठा आरक्षणावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलंय.
मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. एकदा नाही. तर अनेकवेळा धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. तू जिवंत राहणार नाही. तुझी वाट लावू अशी धमकी देते आहेत. शिव्याही दिल्या जात आहेत. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाहीत. पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याचं काय ते पुढे बघतील, असं म्हणत छगन भुजबळ यांनी धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाज कार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठं केलं, असं सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठं हे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यासोबत मी काम केलं आहे. माझं देखील काहीतरी योगदान आहे. म्हणूनच मला संधी दिली गेली असेल. माझा माझ्या समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत.