Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला देशातील या राज्यातून पाठिंबा... अन्यथा आंदोलन देशपातळीवर

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला देशातील या राज्यातून पाठिंबा… अन्यथा आंदोलन देशपातळीवर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

, पुणे, दि. 26 डिसेंबर | मराठा आरक्षणाच्या विषयाची चर्चा राज्यभरात सुरु आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केल्यापासून देशभरात त्याची दखल घेतली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आपणास मनोज जरांगे पाटील कोण आहेत? असा प्रश्न विचारला होता, असे म्हटले होते. आता मनोज जरांगे पाटील २० जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहे. बीड येथील झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली होती. यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची देशपातळीवर चर्चा सुरु झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला देशातून पाठिंबा मिळू लागला आहे. हरियाणामधील मनोज जरांगे यांना समर्थन मिळाले आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर हे आंदोलन देशपातळीवर उभारण्याचा इशारा दिला आहे.

रोड मराठा समाजाचा इशारा

हरियाणा मधील पानिपतच्या रोड मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल, अशी आम्हाला आशा आहे. मात्र सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर आम्ही जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला देशव्यापी आंदोलन बनवू, असा इशारा हरियाणातील रोड मराठा समाजाने दिला आहे.

आता प्रत्येक राज्यातील मराठा एकत्र

मराठा समाज देशातील प्रत्येक राज्यात आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आम्ही राज्यस्तरीय असलेले मराठा आंदोलन देशव्यापी आंदोलन करु. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका रोड मराठा समाजाने स्पष्ट केली आहे. पुण्यातील मराठा समाज आणि शिवप्रेमींना 14 जानेवारीला हरियाणातील पानिपत येथे होणाऱ्या पानिपत शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आले असताना, त्यांनी ही भूमिका मांडली. यामुळे २० जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठोस निर्णय झाला नाही तर देशपातळीवर विविध ठिकाणी आंदोलन सुरु होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments