Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज मनोज जरांगे म्हणाले: भुजबळ यांना मराठयांनी मोठे केल्याचे त्यांनी विसरू नये; मी...

मनोज जरांगे म्हणाले: भुजबळ यांना मराठयांनी मोठे केल्याचे त्यांनी विसरू नये; मी निवडणूक लढायची की नाही त्यांनी शिकवू नये

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांनी प्रथम ग्रामपंचायत निवडणुक लढवून दाखवावी त्यानंतर राजकारणावर बोलावे असे सांगितले. यावर जरांगे म्हणाले, मी निवडणुक लढायची की नाही लढायची हे त्याने मला शिकवयाची गरज नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाने मंत्री छगन भुजबळ यांना मोठे केले अाहे हे त्यांनी विसरता कामा नये. अामच्या नादाला त्यांनी लागू नये. मराठा समाजाने त्यांना मोठे केलेले असून हे त्यांनी उलटे सल्ले देऊ नये असे मत मराठा नेते मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

जरांगे म्हणाले, २००१ च्या कायद्यात आम्हाला आरक्षण दिलेले आहे. २००१ च्या कायद्यानुसार मराठयांच्या सगेसोयरे घ्यायचे आहे. त्यासाठी विधानसभा अधिवेशन लागते. १५ तारखेला मुंबईत अधिवेशन असून त्यात कायदा पारित होईल. अाधी गुलाल उधळला तो अारक्षण खेचून आणल्याचा होता. १५ तारखेनंतर कायदा पारित झाला की, महादिवाळी काय असते अणि गुलाल काय असतो ते पहायला ये असा टोला जरांगे यांनी भुजबळ यांना लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, मराठा अारक्षण हे मिळवण्यासाठी अाम्ही लढा उभारलेला अाहे. ते समाजातील नागरिकांना लवकर मिळावे याकरिता पुन्हा एकदा मुंबईला जाऊन अांदोलन करण्यात येणार अाहे. लोकसभा किंवा इतर कोणती निवडणुक लढण्याची माझी इच्छा नसून समाजाला अारक्षण मिळावे केवळ यासाठीच मी प्रयत्न करणार अाहे. मराठा समाज राज्यात एकजूट असून समाजाला लवकर अारक्षणाा लाभ मिळावा यासाठी मुंबईत अांदोलन करण्यात येणार अाहे. सरकारकडून १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत मराठा अारक्षणबाबत विशेष अधिवेशन सरकारकडून घेतले जाणार अहे त्यापूर्वी अाम्ही हे अांदोलन करत अाहे.

आरक्षणासाठी अाम्ही लढण्यास तयार असून कोणताही दगाफटका यावेळी होऊ नये याकरिता अामरण उपोषण करणार अाहे. मरणास मी घाबरत नसून मराठा समाजातील मुलांचे भविष्याचे भले झाले पाहिजे. सरकारने जे अारक्षण दिले अाहे त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे व्हावे असे अाम्हाला वाटते. कोणताच मराठा पक्षाच्या किंवा नेत्यांचे पाठीमागे नाही. सोशल मिडियावर जे काही येत अाहे त्याकडे लक्ष्य देऊ नका. सरकारल कसं जागे करायचे हे मराठयांना ठाऊक अाहे. नको ते मुद्दे उफाळून सरकारने मराठा अारक्षणाकडे दुर्लण करण्याचा विचार करु नये. १५ जानेवारीला अधिवेशन होऊन गेले की परत विशेष अधिवेशन बोलवले जाणार नाही. मी थांबलो तर करोडो मराठा मुलांचे नुकसान होईल.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments