इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन काल मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत कुठलाही निर्णय तातडीने घेण्यात आला नाही. फक्त शांतता राखावी व मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे हा ठराव एकमुखाने या सर्वपक्षीय बैठकीत झाला. त्यावर “सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे? सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे सांगा” ही मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया होती. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. काल त्यांनी संध्याकाळपासून पाणी बंद करणार असल्याची घोषणा केली होती. बुधवारी सुद्धा राज्याच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. अधिवेशन बोलवून प्रश्न सुटणार नाही, हे देखील तितकच स्पष्ट आहे. एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं महाधिवक्ते तृषार मेहता म्हणाले.