Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमनी लॉन्ड्रीगच्या नावाखाली ऑनलाइन 40 लाखांचा गंडाः शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 15...

मनी लॉन्ड्रीगच्या नावाखाली ऑनलाइन 40 लाखांचा गंडाः शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 15 लाखांची फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील वाकड परिसरात राहत असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात सायबर आरोपींनी फोन करून मुंबई पोलीस आणि मुंबई सीबीआय यामधून बोलत असल्याचे सांगून, आम्ही आपण केलेल्या मनी लॉन्ड्रीग मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपास करणार आहे. आपल्या विरोधात अटक वॉरंट असल्याचे सांगितले. त्यानुसार बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती घेऊन, सायबर चोरट्यांनी संबंधित नागरिकाच्या बँक खात्यातून परस्पर 40 लाख रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सत्यजित वीरेंद्र कुमार (वय- 46, राहणार -वाकड, पुणे) यांनी अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सत्यजित कुमार हे खाजगी नोकरी करत आहे. त्यांना एका अनोळखी नंबर वरून सुरुवातीला फोन आला. त्यांना मुंबई पोलीस मधून बोलत असल्याचे सांगून, स्काईपची मुंबई पोलीस 39 व मुंबई सीबीआय या आयडी वरती जॉईन होण्यास सांगून व्हिडिओ कॉल वरून आपल्या विरुद्ध मनी लॉन्ड्रीग केस मध्ये अटक वॉरंट निघाल्याचे सांगण्यात आले.

ते रद्द करण्यासाठी आपणास सिक्युरिटी रक्कम भरावी लागेल व आम्ही आपण केलेल्या मनी लॉन्ड्रीग मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपास करणार आहोत असे सांगण्यात आले. जोपर्यंत हा तपास सुरू आहे, तोपर्यंत आपण नॅशनल सिक्रेट रोल नुसार कोणाशीही काही बोलू शकत नाही असे देखील सांगण्यात आले. तक्रारदार यांच्याकडून इंटरनेट बँकिंगद्वारे त्यांच्या बँक खात्यातून आरोपींच्या बँक खात्यावर एकूण 40 लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेत, सायबर चोरट्यांनी सदर रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीची आमिषाने 15 लाखांचा फसवणूक

पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या योगेश सुरेश साहू (वय- 37) यांना एका अनोळखी महिला यांनी फेसबुकवरून शोल्डर्स कॅपिटल ऑनलाइन 28 या ग्रुप मध्ये जॉईन केलं. सदर ग्रुप मध्ये प्रशिक्षक रॉबर्ट वंडरसन हा सदर व्हाट्सअप ग्रुप चालवत होता. सदर ग्रुप वरून संबंधित महिलेने तक्रारदार यांना वैयक्तिक मेसेज करून त्यांना एक ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. सदर ग्रुपवरील योजनांच्या माहिती आधारे वेगवेगळ्या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. वेळोवेळी कारणे सांगून संबंधित ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये ते सांगतील ते शेअर मध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक पैसे अल्पावधीत मिळवून देतो असे सांगत, तक्रारदार यांचा विश्वास संपादन करण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी एकूण 15 लाख रुपये ऑनलाईन घेऊन सदर रकमेची आरोपींनी फसवणूक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments