Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमनी लॉन्डरिंगच्या आमिषाने 30 लाख लंपासः सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून...

मनी लॉन्डरिंगच्या आमिषाने 30 लाख लंपासः सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्याकडून डॉक्टरांची दुसऱ्यांदा फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सायबर चोरट्याने पोलीस, सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून कर्वेनगर येथे राहणाऱ्या ६७ वर्षीय डॉक्टरची ३० लाख ५७ हजार ५०२ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी डॉ. दिलीप प्रभाकर गाडगीळ (वय-६७, रा. शाहू कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटसअप वापरकर्ते, विविध बँक धारकावर फसवणुकीसह आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ फेब्रुवारी ते १४ एप्रिल २०२४ दरम्यानच्या काळात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी डॉ. दिलीप गाडगीळ यांना व्हाटसऍप वर व्हिडीओ कॉल करून मुंबई मधून प्रदीप शर्मा बोलत असल्याचे सांगण्यात आले. व्हिडीओ कॉल केला असला तरीही पुढच्या व्यक्तीचा चेहरा मात्र दिसत नव्हता. यावेळी फिर्यादी डॉ. गाडगीळ यांना तुम्ही मनी लॉन्डरिंग केल्याचे सांगण्यात आले. तसेच तुमचा नंबर पोलिसांना देत असल्याचे सांगून या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याची भीती दाखवण्यात आली.

याप्रकरणात मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात येत असून तुम्ही बाहेर जाऊ नका, कोणाला काही सांगू नका असे सांगण्यात आले. यानंतर सायबर चोरटयांनी फिर्यादी डॉ. गाडगीळ यांचा आधार नंबर विचारला आणि त्यानंतर एक फॉर्म भरून घेतला. या फॉर्म मध्ये त्यांच्या सगळ्या बँक खात्याची माहिती घेण्यात आली. तसेच बँक खात्यात किती रक्कम आहे हे सुद्धा विचारले. यानंतर सायबर चोरट्याने फिर्यादी यांना तुमच्या बँक खात्यांच्या तपास करायचा असल्याचे सांगून पहिल्यांदा आरटीजीएसने फिर्यादी डॉ. गाडगीळ यांना पैसे पाठवायला सांगितले. यानंतर वेगवेगळी कारणे सांगून ३० लाख ५७ हजार ५०२ रुपये पाठवायला सांगून फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगतात करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments