Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणी केली चौकशी

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणी केली चौकशी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या मुंबईतील घरावर रविवारी गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सलमानच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सलमान खान यांची भेट घेण्यासाठी अनेक सेलिब्रेटी आणि नेते मंडळींनी सलमानच्या घरी जाऊन चौकशी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल सलमानची भेट भेटली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील सलमान खानची त्याच्या घरी जाऊन भेट घेत चौकशी केली.

रविवारी पहाटे ४.५५ मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी वांद्रे येथे असणाऱ्या सलमान खान यांच्या घरावर गोळीबार केला. यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी हल्लेखोरांचा तपास सुरू केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले आहे. हेल्मेट परिधान करून असलेले दोन हल्लेखोर गडीवरून येत सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळ्या झाडतांना व्हीडिओत दिसत आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली असल्याची देखील माहिती आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली. तसेच त्याला अतिरिक्त सुरक्षा पुरविण्याचे व हल्लेखोरांना पकडण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, अनेक बड्या नेत्यांनी आणि सेलिब्रेटींनी सलमान खानची रविवारी दिवभर भेट घेतली.

संध्याकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील सलमान खानची भेट घेत त्याची चौकशी केली. राज ठाकरे यांनी सलमान खानसह त्याचे वडील सलीम खान यांची चौकशी केली. दोघांचेही संबंध पूर्वीपासून चांगले आहेत. राज ठाकरे हे अनेकदा सलमानच्या वांद्रयाच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांनी रविवारी देखील खान यांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. एकनाथ शिंदे आणि सलमान खान व्यतिरिक्त माजी आमदार बाबा सिद्दीकी, वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांनीही सलमानची भेट घेतली.

सिसिटीव्ही फुटेज आले पुढे

सलमान खान यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचे सिसिटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्या दृष्टीने आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. सीसीटीव्हीच्या साह्याने पोलिस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.

बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्याची जबाबदारी ही बिश्नोई गँगने घेतली. या बाबत फेसबूक पोस्ट करून पुन्हा एकदा सलमानला धमकावून या हल्ल्याची जबाबदारी तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली आहे. त्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज झालेला गोळीबार हा केवळ ट्रेलर आहे. हल्ला झाल्यावर पाच तासांनी ही पोस्ट करण्यात आली. बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असून त्याच्या भावाने ही पोस्ट टाकली असल्याचे पोलिसांनी संगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments