इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
आपण सुंदर दिसावं असे केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनादेखील वाटत असतं. त्यानुसार, काही प्रयत्न देखील केले जातात. त्यात आपल्या चेहऱ्यावर झटपट चमक आणायची असेल तर काही उपाय केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात फेसपॅक तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
चेहऱ्यावर हनी फेस पॅक अर्थात मधाचा फेस पॅक लावल्यास त्वचेवर चांगला परिणाम दिसू शकणार आहे. हा हनी फेस पॅक लावायचा असेल तर 2 चमचे तांदळाचे पीठ मधात टाका. चेहऱ्यावर मधाचा वापर केल्याने त्वचेमध्ये चांगला बदल दिसून येऊ शकतो. याव्यतिरिक्त, चेहऱ्यावरचा कोरडेपणा देखील कमी होऊ शकेल. हनी फेस पॅक लावायचा असेल तर काही काळजी देखील घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ आणि दही घालून चांगले मिक्स करावे. यानंतर भांड्यात दोन चमचे मध आणि एक चमचा ग्लिसरीन घालून मिक्स करावे.
त्यानंतर तयार केलेला पॅक चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा धुवावा आणि नंतर त्वचेवर कमालीचा फरक जाणवू शकेल आणि त्वचा चमकदार होऊ शकते.