Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजमध्य रेल्वेच्या पुणे विभागाचा फुकट्यांना दणका; पावणेदहा कोटी केले वसूल

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचा फुकट्यांना दणका; पावणेदहा कोटी केले वसूल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट प्रवासी / अनियमित प्रवासी आणि बुक न केलेले सामान यांच्या १,४६,९४६ प्रकरणांमधून ९ कोटी ७५ लाख रुपये वसूल केले आहेत. पुणे विभागात ऑगस्ट २०२४ मध्ये तिकीट तपासणी दरम्यान १९,९५० प्रवासी विना तिकीट प्रवास करत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ७,४२,५,६४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

यासोबतच अनियमितपणे आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या २२९९ प्रवाशांकडून ८७,८,२२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच साहित्य बुक न करता घेऊन जाणाऱ्या ३३६ प्रवाशांकडून ४२,९३० रुपये दंड वसूल करण्यात आला. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून नियमितपणे तिकीट तपासणी करण्यात आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. अन्यथा रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागू शकतो. तसेच पैसे न भरल्यास तुरुंगवासाचा शिक्षा भोगावी लागू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments