Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमतदान केंद्रावर पोलिसांशी वाद घालत गैरवर्तन केल्याने 4 जणांवर गुन्हाः

मतदान केंद्रावर पोलिसांशी वाद घालत गैरवर्तन केल्याने 4 जणांवर गुन्हाः

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त सुरु असताना मुंढवा परिसरातील सारथी प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप इंग्लीश स्कूल येथे बूथ क्रमांक २८ याठिकाणी मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जात व्हिडिअो शुटिंग करुन पोलिसांशी वाद घालून गैरवर्तन केल्याने मुंढवा पोलिस ठाण्यात भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार नारायण अंकुशे यांच्यासह इतर तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत सहाय्यक पोलिस फौजदार कृष्णा रामचंद्र गवांदे (वय-५७) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे मुंढवा परिसरातील केशवनगर मध्ये ज्ञानदीप इंग्लिश स्कूल मध्ये नेमणूकीस होते. त्यावेळी बूथ क्रमांक २८ याठिकाणी नारायण अंकुशे व इतर तीनजण येऊन त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात तसेच मतदान केंद्राच्या अात कोणीही गडबड गोंधळ करणार नाही तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारे फोटोग्राफीर अथवा व्हिडिअो करणार नाही याबाबत अादेश पारित केलेले असताना, देखील विनापरवाना मतदान बुथ मध्ये प्रवेश केला. मतदारांवर गैरवाजवी प्रभाव पाडण्याकरिता अारडाअोरड करुन मोबाईल फोन मध्ये व्हिडिअो शुटिंग करुन मतदान केंद्रावर गैरवर्तन केले अाहे. याप्रकरणी अारोपींवर भादंवि कलम १८८, १७१ (एफ), ३४ लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १३१, १३२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments