Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्… महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर पायी जात असताना एका मतदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील दाभेकर कोंड या ठिकाणी घडली आहे. तालुक्यातील किंजळोली गावाजवळ असलेल्या दाभेकर कोंड मतदार केंद्रा जवळ काही मीटर अंतरावरच ही घटना घडली.

लोकसभा निवडणुकीसाठी आज रायगड मतदार संघामध्ये मतदान घेतले जात असून महाड विधानसभा मतदारसंघ मधील दाभेकर कोंड या केंद्रावर देखील सकाळी नियोजित वेळेत मतदानाला सुरुवात झाली होती.

या मतदान केंद्रामध्ये मतदान करण्याकरता दाभेकर कोंड येथील प्रकाश चिनकटे हे सकाळी मतदानासाठी आपल्या घरून पायी निघाले होते. मतदार केंद्राजवळ काही मीटर अंतरावर आले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अचानक त्यांची दातखिळी बसली. व ते तेथेच खाली कोसळले मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खुर्चीमध्ये देखील बसवले व पुढील उपचारासाठी तात्काळ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

प्रकाश चिनकटे यांच्या मृत्यूमुळे किंजळोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा मृत्यू नक्की कोणत्या कारणाने झाला असावा याचा तपास सुरू आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments