Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; शपथपत्रात माहिती दडवल्याचा आरोप, मुंबई हायकोर्टात होणार...

मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; शपथपत्रात माहिती दडवल्याचा आरोप, मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बीड : मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शपथपत्रात माहिती दडवल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होत आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात २० फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. हायकोर्टाकडून धनंजय मुंडे यांना नोटीसही पाठवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा होऊ लागली आहे.

याबाबत धिक माहित अशी की, मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध राजाभाऊ श्रीराम फड यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांच्याकडून प्रतिवादींसह मंत्री धनंजय मुंडे व इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निवडणूक याचिकेवर २० फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. धंनजय मुंडे यांनी शपथपत्रात दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे. मात्र पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख केलेला नाही. करुणा मुंडे यांच्या नावावर असलेली वाहने, फ्लॅट, विमा पॉलिसी, सोन्याचे दागिने, तसेच बँकेतील जॉइंट अकाउंट, मालमत्ता व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे यांची माहिती दडवून देण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.

निवडणुकीपूर्वी राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल करून परळी मतदारसंघातील २३३ पैकी १२२ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्याची विनंती केली होती. याचिकेत निवडणूक अधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल करून लोकशाही पद्धतीने निर्भय वातावरणात निवडणूक घेण्याचे, तसेच इतर बाबींबद्दल केलेले निवेदन लेखी हमी म्हणून स्वीकारून खंडपीठाने याचिका निकालात काढली होती. परंतु धनंजय मुंडे यांच्या राजकीय दबावापोटी निवडणूक आयोगाकडून शपथपत्रात नमूद केलेला शब्द पाळण्यात आला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments