Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमंडलिकांच्या शाहू महाराजांवरील 'दत्तक' टीकेनंतर शरद पवार म्हणाले, ही गोष्ट काही...

मंडलिकांच्या शाहू महाराजांवरील ‘दत्तक’ टीकेनंतर शरद पवार म्हणाले, ही गोष्ट काही…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यावर ‘दत्तक’ प्रकरणावरुन टीका केली. या टीकेनंतर मंडलिक हे राजकीय टीकेचे धनी झाले आहेत. यावर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी मंडलिकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

शरद पवार म्हणाले, “संजय मंडलिक काय म्हणाले हे मला नेमकं माहिती नाही. राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही, अनेकजण अशा पद्धतीनं राजे झालेत. एकदा दत्तक घेतल्यानंतर तो त्या घराण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो. आज ज्यांच्याबद्दल अशा प्रकारची विधान केली जातात. याचा अर्थ किती खालच्या स्तरावर विरोधक जातात, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे.

कोल्हापुरचे शाहू महाराज हे जनमानसात अतिशय आदर असलेले व्यक्ती आहेत. आपण जिथं बसलो आहोत तिथून थोड्या अंतरावर गेलात तर एका शैक्षणिक संस्थांची लाईन आहे. या सर्व संस्थांचं नेतृत्व शाहू महाराज करतात. त्यामुळं राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज या ठिकाणी करत आहेत. त्याच्याबद्दल कोल्हापुरच्याच नव्हे तर बाहेरच्या जनतेतही कृतज्ञता आहे आणि अशा व्यक्तीबद्दल अशा प्रकारे उल्लेख करायचा यातून विरोधकांची मानसिकता लक्षात येते, अशा शब्दांत शरद पवारांनी मंडलिकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

संजय मंडलिकांनी काय केली होती टीका?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून संजय मंडलिक हे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून शाहू महाराज हे उमेदवार आहेत. त्यामुळं मंडलिक यांनी प्रतिस्पर्धी म्हणून शाहू महाराजांवर टीका केली.

ही टीका करताना त्यांनी म्हटलं की, “आत्ता जे महाराज आहेत ते कोल्हापुरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत ते सुद्धा दत्तकच आहेत. त्यामुळं तुम्ही, आम्ही आणि कोल्हापुरची जनता ही खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार जपला. मल्लाला हातंच मारायचं नाही, अन् टांगली मरायची नाही मग कुस्ती कशी होणार” मंडलिकांच्या या विधानामुळं राजकीय टिका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments