इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे पुण्यातील आणखी एक रुग्णालय अडचणीत आले आहे. शस्त्रक्रियेसाठी 20 हजार रुपये घेणाऱ्या लवळे येथील सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रवीण लोहोटे असं गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. प्रवीण लोहोटे हे लवळे येथील सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल येथे सेवेत आहेत. त्यांच्यावर ‘पैसे दिले तरच ऑपरेशन केले जाईल’, असे म्हणंत महिला रुग्णाच्या नातेवाईकांकडून 20 हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी महिला रुग्णाच्या पुतण्याने बावधन पोलीस ठाण्यात डॉ. प्रवीण लोहोटे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. रुग्णालयाची ‘धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणी असूनही महिला पेशंटची प्रकृती नाजूक असूनही, तत्काळ उपचार करावे लागतील. पैसे भरले नाहीत तर पेशंट दगावू शकतो.’, अशी भीती डॉक्टरांनी दाखविल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.