Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजमंगलदास बांदल यांच्या पुणे व शिक्रापूर येथील घरावर ईडी अथवा आयकर विभागाचे...

मंगलदास बांदल यांच्या पुणे व शिक्रापूर येथील घरावर ईडी अथवा आयकर विभागाचे छापे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिरूर, (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती पै. मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर व पुण्यातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालय (ईडी) अथवा आयकर विभाग (INCOME TAX) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी (ता. 20) पहाटे पहाटेपासुन तब्बल 6 तास उलटले तरी कारवाई सुरु आहे. अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बांदल यांच्या निवासस्थानी ईडीने पथक दाखल झाल्याची चर्चा असून त्यांच्यावर निवासस्थानी झाडाझडती सुरू आहे. तर सक्तवसुली संचालयाने यापूर्वी बांदल यांच्या निवासस्थानी कारवाई करुन काही मालमत्ता सिल करण्याची कारवाई यापूर्वी केली आहे.

पुणे शहरातील हडपसर आणि शिक्रापूर येथील दोन्ही घरांवर ईडीने धाड टाकली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य घरातच असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदच्या माजी सदस्या रेखा बांदल या मंगलदास बांदल यांच्या पत्नी आहेत. बांदल यांचे भाऊ आणि पत्नी शिक्रापूर येथील निवासस्थानी आहेत तर हडपसर येथील निवासस्थानी स्वतः मंगलदास बांदल आणि सोबत पुतणे आहेत.

मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर शिरूर तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे. पण, ईडीकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. दरम्यान, मंगलदास बांदल हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, तर विधानसभा निवडणुकीबाबत ते चाचपणी करत होते.

मंगलदास बांदल हे एका बँकेच्या प्रकारणामध्ये तुरुंगातून जामिनावर बाहेत आहेत. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर विरोधकांचा हा डाव असावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments