Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजभ्रष्टाचाराला सिस्टिममध्ये बसविण्याचा नवा आदर्श; जयंत पाटील यांची भाजपवर टीका

भ्रष्टाचाराला सिस्टिममध्ये बसविण्याचा नवा आदर्श; जयंत पाटील यांची भाजपवर टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – भारतीय जनता पक्षाने (भाजप) निवडणूक रोख्यांद्वारे भ्रष्टाचाराला सिस्टिममध्ये बसवून एक नवा आदर्श दिला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी (ता.२०) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भाजपवर केली.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बजरंग सोननणे यांनी आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात मोठ्या धनिकांना २५ लाख कोटी रुपयांची कर्ज माफी दिली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा वेग वाढला आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून अनेक आश्वासने देण्यात आली. पण त्यांना आता त्यांनीच दिलेल्या आश्वसानांचा विसर पडला आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणाले होते. पण त्याऐवजी वस्तू व सेवा कर लादला. देशात मोठ्या प्रमाणात महागाई, बेकारी वाढली आहे. यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारकडून जाहिरातीचा भडिमार सुरू होता. परंतू आता आचारसंहिता लागू झाल्याने, या जाहिराती बंद झाल्या आहेत.’

‘आमदार निलेश लंकेंमुळे बांध फुटला’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरसुद्धा या पक्षाचे बरेचसे आमदार शरद पवार यांच्यासमवेत असल्याचे मी पहिल्यापासून सगळ्यांना सांगत होतो. यापैकी अनेक जण पक्ष फुटल्यावरसुद्धआ बऱ्याच वेळा भेटले होते. त्यापैकी काही जणांनी आता परत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात करत, आमदार निलेश लंके यांनी बांध फोडला आहे. आता हळूहळू पाणी येण्यास सुरुवात झाली असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments