Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजभोसरी परिसरात खराखुरा सैराट : चिडलेल्या भावाने केला मेहुण्याचा खून; अन् मृतदेह...

भोसरी परिसरात खराखुरा सैराट : चिडलेल्या भावाने केला मेहुण्याचा खून; अन् मृतदेह…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या संतापातून तिच्या भावाने नातेवाईकांच्या मदतीने मेहुण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भोसरी परिसरातील मोशी येथील औद्योगिक परिसरात घडली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अमीर मोहम्मद शेख (वय-25 रा. रांधे ता. पारनेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, रांधे येथील आमिक शेख आणि त्याच्या शेजारी राहणा-या मुलीने चार महिन्यांपूर्वी आळंदी (पुणे) येथे आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यानंतर ते मोशी येथे राहत होते. मृत व्यक्ती अमीर शेख खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करत होता. बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या संतापातून तिच्या भावाने नातेवाईकांच्या मदतीने (15 जून) रोजी आमीरचा गळा आवळून खून केला आणि नंतर त्याचा मृतदेह आळंदी चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेऊन जाळला आहे.

दरम्यान, आमीरच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. आमीरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यावर पोलीसांनी तपास करुन खुनाचा उलगडा केला. तसेच तीन आरोपींना अटक केली आहे.

अमीर आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांचे कुटुंब वीस वर्षापासून शेजारी राहत होते त्यांच्या संबंधात सलोखा होता. मात्र, दोघांनी प्रेमविवाह केल्यामुळे त्यांच्या संबंधामध्ये मोठी दरी निर्माण झाली होती.

याप्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव, गणेश दिनेश गायकवाड, सुशांत गोपाळ गायकवाड, सुनील किसन चक्रनारायण यांच्या विरोधात आयपीसी 364, 302, 201, 120 ब आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पंकज पाईकराव, सुशांत गायकवाड आणि सुनील चक्रनारायण यांना अटक करण्यात आली आहे. तर गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी अजूनही फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments