Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंचा इशारा

भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वेल्हे: लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना भोर, वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्यांत मिळून केवळ १९ हजारांचे मताधिक्य मिळाले. मग भोर, वेल्हे, मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारामती लोकसभा संघटक वसंत मोरे यांनी केला.

भोर मतदारसंघाचे आमदार काँग्रेसचे आहेत. या तीनही तालुक्यांतील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदा, नगरपालिका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. असे असूनही या तीन तालुक्यांत खासदार सुप्रिया सुळे यांना १९ हजारांचे मताधिक्य आहे. पवारांच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावून तो ढासळायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

चेलाडी ते वेल्हे हा ३० किलोमीटरचा रस्ता लोकप्रतिनिधींना नीट करता आलेला नाही. या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. मढेघाट फोडणार असे निवडणुकीच्या वेळी दिले जाणारे आश्वासन खोटे असून, तालुक्यातील जनतेने आता या प्रस्थापित नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. वेल्हे तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा दोन नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाची ताकदही मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करून पक्षाची ताकद वाढविण्यात येईल, असे पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments