Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज भिडेवाड्यासाठी आले चार आराखडे; पालिका लवकरच करणार एका आराखड्याची निवड

भिडेवाड्यासाठी आले चार आराखडे; पालिका लवकरच करणार एका आराखड्याची निवड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने कडेकोट पोलिस बंदोबस्तात भिडेवाड्याच्या जागेचा ताबा घेत भूसंपादनाची कार्यवाही केली. भिडेवाड्याचे जुने स्ट्रक्चर पाडून जागेचा ताबा घेण्याची ही प्रक्रिया मंगळवारी (दि. ५) पहाटे पावणेचारपर्यंत सुरू होती. राष्ट्रीय स्मारक कसे असावे, याचा आराखडा नामवंत वास्तू विशारद (आर्किटेक्ट) यांच्याकडून महापालिका प्रशासनाकडे सादर झाले आहे.

लवकरच या आराखड्याचे सादरीकरण महापालिका आयुक्तांकडे केले जाणार आहे. त्यातील एका आराखड्याची निवड केली जाईल. त्यामुळे भिडेवाडा आता नव्या रूपात अवतरणार आहे. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. फुले दाम्पत्यांच्या या कार्यास अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी म्हणून भिडे वाडा हा राष्ट्रीय स्मारक झाला पाहिजे, अशी मागणी होत होती. या संदर्भात अनेक वेळा मोर्चे, आंदोलने झाली.

पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने २००८ मध्ये भिडेवाडा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. या विरोधातील न्यायालयीन लढा १३ वर्षांनंतर महापालिकेने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जिंकला. भिडेवाड्याची जागा एका महिन्यात म्हणजे ३ डिसेंबरपर्यंत ताब्यात द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जागा मालक आणि भाडेकरूंना दिले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने कडेकोट पोलिस बंदोबस्तात सोमवारी मध्यरात्री भिडेवाडा ताब्यात घेण्याची कारवाई केली. महापालिकेने भिडेवाडा पहाटे पावणेचार वाजेपर्यंत जमीनदोस्त केला.

लवकरच आराखड्याचे सादरीकरण

भिडेवाडा या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पुण्यातील चार नामवंत वास्तू विशारदाकडून (आर्किटेक्ट) आराखडे आले आहेत. या आराखड्याचे आयुक्तापुढे सादरीकरण केले जाणार आहे. त्यातील एका आराखड्याची निवड केली जाणार आहे. त्यामुळे भिडेवाडा आता नव्या रूपात अवतरणार आहे.

हर्षदा शिंदे, भवन विभागप्रमुख, पुणे महापालिका

भिडेवाड्याची जागा ताब्यात घेण्याची कारवाई आता पूर्ण झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्याची कागदपत्रे महापालिकेच्या भवन विभागाकडे सादर केली जातील. त्यानंतर भवन विभाग पुढील कार्यवाही करेल.

– प्रतिभा पाटील, उपायुक्त, भूसंपादन विभाग, पुणे महापालिका

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments