इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
भिगवण : नादुरुस्त झालेल्या एसटी बसला टोचण लावून दुरुस्तीकरीता घेऊन जात असताना भिगवणजवळ एसटी च्या टायरने अचानक पेट घेतल्याने एसटी बस पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यावेळी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही
भिगवन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.4) रात्री पावणे एकच्या दरम्यान एसटी बस (एमएच 14 बीटी 4397) ही बंद पडलेली बस इंदापूर येथून तळेगाव डेपो पिंपरी चिंचवड येथे टोचन लावून घेऊन निघाले होते. सदर एसटी दुरुस्तीला घेऊन जात असताना भिगवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पदमावती ऑईल डेपो, ब्रिजजवळ भिगवण येथे सोलापूर बाजूकडून पुण्याकडे जाणा-या महामार्गावरून जात असताना एस टी ड्रायव्हरला मागच्या टायरला आग लागल्याचे निदर्शनास आले. टायरला आग लागल्यानंतर आगीने अचानक रौद्र रूप धारण केल्यामुळे पुर्ण बस पेट जळून खाक झाली आहे.
सदर एस.टी बस चालकांचे नाव विठ्ठल दिनकर रायबोले हे असून टोईंग करून घेऊन जाणारे एस.टी. बस चालकाचे नाव संदीप सखाराम साळवे असे आहे. या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळावरील पेटलेल्या बसचा फायर ब्रिगेड, पोलीस स्टाफ व स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविली आहे. सुदैवाने यावेळी कोणीही जखमी झालेले नाही.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक जर्द, पोलीस हवालदार लोडी, पोलीस कॉन्स्टेबल सुद्रीक बोरुडे आदी दाखल झाले व आग विझविण्यासाठी कुरकुंभ एमआयडीसी व बिल्ट कंपनी येथून फायरब्रिगेडचे वॉटर पंप मागविण्यात आले. कुरकुंभ एमआयडीसीचे प्रदीप पाहूणे, गणेश पांडूरा वैद्र, प्रविण शरद माने, अजय सुरेश पडूळ तसेच बिल्ट कंपनीचे सुशिल मुत्राप्रसाद चौधरी, मनिष सोमनाल मिना, राजाराम रामचंद्र ठोंबरे, दत्तात्रय अंकूश वाघ आणि त्यांचा स्टाफ असे हजर राहून त्यांनी बसला लागलेली आग विजविली.
सदर बस ही दुरूस्ती करीता घेवून जात असल्याने बसमध्ये ड्रायव्हर व्यतिरीक्त अन्य कोणीही एसटीमध्ये नव्हते. वेळीच ड्राव्हर खाली उतरल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.