Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजभिंतीवर डोकं आपटल्याने मृत्यू: दारूच्या नशेत असतांना केली धक्काबुक्की, सहकाऱ्यावर सदोष मनुष्य...

भिंतीवर डोकं आपटल्याने मृत्यू: दारूच्या नशेत असतांना केली धक्काबुक्की, सहकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दारूच्या धुंदीत अंगावर आलेल्या तरूणाला धक्काबुक्की करून ढकलून दिल्याने त्याचे डोके भिंतीवर आपटून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार शवविच्छेदन अहवालातून समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदिप परशुराम शिंदे (32) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विजय अशोक मेटकर (39, रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 4 फेब्रुवारी रोजी दीड वाजता राजेंद्रनगर येथील पीएमसी कॉलनीतीतील खोली क्रमांक 33 मध्ये घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय मेटकर याने प्रदिप शिंदे हा दारूच्या नशेत असून त्याला धक्काबुक्की केली असता तो खाली पडून इजा होवु शकते, अशी जाणीव त्याला होती. असे असताना प्रदिप दारूच्या नशेत त्याच्या अंगावर जात असताना त्याने त्याला ढकलून दिले. यामुळे तोल जाऊन प्रदिपचे डोके भिंतीवर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता सदोश मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments