Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज भावाच्या मित्राने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर प्रकरणाचा उलगडा

भावाच्या मित्राने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर प्रकरणाचा उलगडा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : भावाच्या मित्राने अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वेळोवेळी फोन करून, तुला सुखात ठेवीन असे सांगत प्रेमसंबंध निर्माण केले. यानंतर प्रकरण इतके पुढे गेले की आरोपीने १६ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. ती चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर अखेर हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी १६ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ वर्षीय पीडितेने रविवारी (दि. ३) पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून गणेश उर्फ दीपक जाधव (रा. कात्रजगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आरोपी गणेश जाधव याच्या घरी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाचा मित्र आहे. आरोपीने मुलीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिला वेळोवेळी फोन करत, तुला सुखात ठेवीन असे सांगून मुलीला स्वतःच्या घरी बोलवून घेतले. यानंतर आरोपीने मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

यातून मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार तिच्या घरच्यांसमोर उघडकीस झाला. यानंतर कुटुंबियांनी पीडितेला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता तिने घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी लगेचच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घोगरे या करत आहेत.

RELATED ARTICLES

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

फायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) फायनान्सचे बाऊन्सिंग चार्जेस भरले नसल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी रिक्षा ताब्यात मागितली. त्यावेळी रिक्षा देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा...

Recent Comments