Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज भावजयीचा खून करून पसार, आरोपीस ठोकल्या बेड्याः लष्करी अधिकारी असल्याचे भासवून...

भावजयीचा खून करून पसार, आरोपीस ठोकल्या बेड्याः लष्करी अधिकारी असल्याचे भासवून 20 लाखांचा गंडा, पुण्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कौटुंबिक वादातून स्वतःच्या भावाच्या मदतीने त्याच्या पत्नीचा डोक्यात दगड घालून निघृण खून केल्यानंतर तिचा मृतदेह पाचार्णे गावच्या डोंगरात आरोपींनी खड्डा करून पुरला. शांत डोक्याने प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर घरी येऊन आरोपींनी मटनाची पार्टी केली. त्यानंतर हा गुन्हा केल्यापासून फरार झालेल्या एकाला लोणीकंद पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. गणेश रामभाऊ चव्हाण (21, रा. शिरगाव परंदवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

लोणीकंद पोलिसांना माहिती मिळालेली की, पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलिस ठाण्यात गणेश चव्हाण हा पाहीजे आरोपी आहे. त्याने शिरगाव परंदवाडी येथे त्याची भावजय सुनंदा चव्हाण हिचा त्याचा भाऊ लक्ष्मण चव्हाण याच्या मदतीने तिच्या डोक्यात दगड घालून निघृण खून केला होता. नंतर भावजयचे प्रेत जवळ असणाऱ्या पाचार्णे गावच्या डोंगरात नेवुन तिथे खड्डा खोदून तेथे दोघांनी पुरले होते. शांत डोक्याने हा खून करून पुरावा नष्ट केल्यानंतर दोघांनी घरी येऊन दारू व मटनाचे जेवण बनवुन पार्टी देखील केली होती. संबधित पसार आरोपी हा लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची माहिती पोलिस नाईक अजित फरांदे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांना याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे, अमंलदार किरण पड्याळ, अजित फरांदे, प्रतिक्षा पानसरे यांनी गणेश चव्हाणला लोणीकंद येथील जिल्हा परिषद शाळेपासून आरोपीला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी परंदवाडी पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक सचिन सुर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्यावर यापूर्वी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात मोक्काची कारवाई झाली आहे.

लष्करी अधिकारी असल्याचे भासवून फ्लॅट

भाडयाने घेण्याचे बहाण्याने 20 लाखांचा गंडा

भारतीय लष्करात अधिकारी असल्याचे भासवून पुण्यातील वारजे परिसरात भाडयाने फ्लॅट घ्यावयाचा आहे, असे भासवून एका नागरिकास तब्बल २० लाख ८३ हजार रुपयांचा अॉनलाईन गंडा घालण्यात अाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वप्नील विकासचंद्र गाडे (वय-४३, रा. कर्वेनगर, पुणे) यंनी अज्ञात मोबाईल क्रमांकधारक तसेच वेगवेगळ्या बँक खात्याचे खातेधारक व युपीअाय अायडीचे वापरकर्ते यांचे विरोधात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार ६/९/२०२३

रोजी घडला असून तक्रारदार यांनी गुन्हा घडल्यावर याबाबत सायबर पोलीस ठाण्यात सुरुवातील तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात ही तक्रार अाल्यावर अारोपींवर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तक्रारदार स्वप्नील गाडे यांना अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने सुरुवातीला फोनवर संर्पक केला. त्यांना लष्करात अधिकारी पदावर काम करत असल्याचे अारोपीने भासवले. त्याचे बनावट अओळखपत्र, लष्करी ड्रेस मधील फोटो देखील दाखवले गेले. त्यामुळे तक्रारदार यांचा त्याच्यावर विश्वस बसला. अारोपीने त्यास तक्रारदार यांचे भावाचा फ्लॅट भाडयाने घेण्याचा असल्याचे सांगून अडमिनीस्ट्रेशन डिपार्टमेंट मध्ये भाडयाची रक्कम पाठविण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याच्या नावाखाली सुरुवातीला काही रक्कम तक्रारदार यांना पाठविण्यास सांगितली. तसेच वेगवेगळी कारणे देऊन तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठवलेली रक्कम परत देण्याच्या बहाण्याने पुन्हा पुन्हा तक्रारदार यांना पैसे पाठविण्यास सांगून अारोपींनी संगनमताने तक्रारदार यांची २० लाख ८३ हजार रुपयांची अार्थिक फसवणुक करण्यात अाली अाहे. याबाबत पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करत आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments