Saturday, September 14, 2024
Homeक्राईम न्यूजभावकीच्या वादातून हत्या...! डोक्यात कोयत्याने वार करुन सराईत गुन्हेगाराचा निघृण खून

भावकीच्या वादातून हत्या…! डोक्यात कोयत्याने वार करुन सराईत गुन्हेगाराचा निघृण खून

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : महाळुंगे एमआयडीसी परिसरात दुचाकीवरून चाललेल्या एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करुन निघृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी डोक्यात दोन वर्मी घाव घालून हत्या केली. सराईत गुन्हेगार गणेश अनिल तुळवे (वय-31 रा. खालुंब्रे, ता. खेड) असं खून करण्यात आलेल्या गन्हेगाराचे नाव आहे.

ही घटना चाकण-तळेगाव मार्गावर खालुंब्रे गावच्या हद्दीत सोमवारी (दि. ०१) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, गणेश तुळवे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असून तो दोन वर्ष तडीपार होता. काही महिन्यापूर्वी तो गावात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तुळवे हा दुचाकीवरुन त्याच्या भाच्यासह खालुंब्रे येथे त्याच्या घरी जात असताना चाकण-तळेगाव मार्गावर थांबला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण येथे पाठवण्यात आला.

दरम्यान, भावकीतील संशयित आरोपी आणि त्याचा एक साथीदार फरार झाले आहेत. हा खून भावकीच्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments