Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजभारतीय लष्करात नोकरी लावण्याचे आमिषः फसवणूक करणाऱ्यास अटक

भारतीय लष्करात नोकरी लावण्याचे आमिषः फसवणूक करणाऱ्यास अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भारतीय लष्करात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक करून नेपाळला पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. गणेश बाबुलाल परदेशी (रा. कृष्ण केवला सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी गणेश परदेशीने लष्करात नोकरीच्या आमिषाने आठ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. परदेशीने त्याचे राहण्याचे ठिकाण बदलले होते. ओळख लपविण्यासाठी तो स्वतःचा चेहरा कापडाने झाकायचा. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, विकास मरगळे, शशांक खाडे यांना मिळाली होती.

त्यानुसार कोंढवा भागातील एका दुकानात चेहरा झाकून कापड खरेदीसाठी आलेल्या परदेशीला पोलिसांनी सापळा लावून पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, उपनिरीक्षक वैभव सोनवणे, अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजीत रन्तपारखी, शशांक खाडे यांनी ही कारवाई केली.

लॅपटॉप चोरून पाळलेला संगणक अभियंता अटक

संगणक विक्री दुकानातून लॅपटॉप चोरून, तसेच अन्य साहित्य चोरून पसार झालेल्या संगणक अभियंत्यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. समीर रामनाथ थोरात (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी थोरात एका संगणक विक्री दुकानात कामाला होता. ग्राहकांच्या लॅपटॉप दुरुस्तीचे तो काम करत होता. संगणक विक्री दुकानाचे मालक कामानिमित्त दुबईला गेले होते. थोरातने दुकानातील चार लॅपटॉप, अन्य साहित्य असा मुद्देमाल चोरून नेला होता. थोरात लॅपटॉप चोरून पसार झाल्यानंतर दुकान मालकाने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली होती. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी आरोपीला पकडण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सायबर गुन्हे पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.

तांत्रिक तपासात थोरात अहमदनगर आणि शिवाजीनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने थोरातला सापळा लावून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी ही कारवाई केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments