Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजभारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी श्रीकांत ताम्हाणे यांची...

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी श्रीकांत ताम्हाणे यांची नियुक्ती

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : महाराष्ट्र राज्याचे युवा मोर्चा अध्यक्ष अनुप दादा मोरे यांचे हस्ते श्रीकांत ताम्हाणे यांची भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यातील एखतपूर मुंजवडी सारख्या छोट्या गावातील कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ संघटनाबाबत प्रामाणिकपणे केलेले कार्य विविध आंदोलने, मोर्चा, तरुण तरुणी यांचे उत्तम संघटन तसेच यापूर्वी जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस म्हणुन केलेले कार्य, हे पाहून जबाबदारी मिळाली आहे.

या पुढे राज्यभर फिरून संघटन वाढ करून दिलेली जबाबदारी यशस्वी पार पाडेल, हा विश्वास ताम्हाणे यांनी व्यक्त केला आहे. या जबाबदारी बद्दल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच माझे आधारस्तंभ राज्याचे भारतीय जनता पार्टी महासचिव विक्रांत दादा पाटील व पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे, जालिंदर भाऊ कामठे, आमदार अशोक टेकवडे, शरद ढमाले, पंडित दादा मोडक, गंगाराम दादा जगदाळे, नीलेश जगताप, संदीप बापू हरपले, मयूर जगताप, मंगल ताई पवार, गणेश भोसले, संतोष जगताप यांनी सन्मान केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments