इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेल्याएलॉन मस्क यांची वाहन कंपनी टेस्ला भारतात येण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, कंपनीची वाटचालही सुरु आहे. कंपनीने भारतात कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे आणि एप्रिलमध्ये भारतात आपली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची शक्यता आहे. असे असताना आता भारतात एंट्री करण्यापूर्वीच एलॉन मस्क यांना झटका बसला आहे. मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहिला मिळत आहे.
मस्क यांची दिल्ली आणि मुंबईत शोरूम उघडण्याची योजना आहे. मात्र, भारतात येण्यापूर्वीच कंपनीला मोठा झटका बसला. कंपनीचे शेअर्स बुधवारी 3.96% घसरले आणि कंपनीचे मार्केट कॅप नोव्हेंबरनंतर प्रथमच $1 ट्रिलियनच्या खाली आले. मस्क यांच्या कंपनीची मार्केट कॅप आता $935.36 आहे आणि ती जगातील सर्वात व्हॅल्यूएबल कंपन्यांच्या यादीतील टॉप 10 मधून बाहेर पडली आहे. एका अहवालानुसार, कंपनीचे गुंतवणूकदार चांगलेच घाबरल्याचे दिसत आहे. त्यांना कंपनीच्या भवितव्याची चिंता आहे.
तसेच टेस्ला त्याच्या पहिल्या तिमाहीतील अंदाजे वितरणापेक्षा कमी वाहने विकेल. सध्या असा अंदाज आहे की, पहिल्या तिमाहीत 422000 वाहने विकली जातील. परंतु, ‘ब्लॅक’ या संस्थेच्या अहवालानुसार, टेस्ला फक्त 380,000 वाहने विकू शकेल, असा अंदाज आहे.
मस्क यांच्या कार्यपद्धतीवर होतीये टीका
टेस्लाच्या अडचणीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने आपल्या चारही फॅक्टरीज् काही काळासाठी बंद केल्या आहेत. त्यात एलॉन मस्क यांच्या वागण्यामुळे कंपनीच्या ब्रँडच्या प्रतिष्ठेवरही परिणाम होत असल्याचे म्हटले जात आहे. मस्क यांच्यावर राजकीय वादविवादांपासून ते वैयक्तिक वादांपर्यंत टीका होत आहे. काही लोकांनी त्यांच्या कंपनी चालवण्याच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.