इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असे रेल्वे नेटवर्क आहे. लांबचा प्रवास असल्यास आपल्यापैकी अनेकजण भारतीय रेल्वेलाच पसंती देतात. हा प्रवास अगदी सुखद आणि परवडणाराही असतो. त्यामुळे त्याचा वापर बहुतांश लोक करतात. भारतात दररोज 13 हजारांहून अधिक रेल्वे गाड्या रुळांवर धावतात. काही गाड्या लांब अंतर कापतात तर काही गाड्या कमी अंतर कापतात.
भारतात अशी एक ट्रेन आहे ती सर्वांत लांब तर आहेच आणि नॉनस्टॉपही धावते. या रेल्वेची खासियत म्हणजे तब्बल 500 किमीपर्यंतचे अंतर ही रेल्वे ब्रेक न लावता धावते. म्हणजेच ही रेल्वे 500 किमीचे अंतर विनाथांबा पार करते. या रेल्वेचे नाव आहे मुंबई सेंट्रल-हापा दुरांतो एक्सप्रेस. ही ट्रेन सर्वात लांब नॉन-स्टॉप अंतर कापते. ही ट्रेन 493 किमी अंतरापर्यंत न थांबता धावते. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 5 तास 50 मिनिटांत पूर्ण करते.
मुंबईहून हापाला जाणारी ही ट्रेन प्रवासात फक्त 3 ठिकाणी थांबते. मुंबईहून रात्री 11 वाजता सुरू होणारी ही ट्रेन 493 किमी नॉन-स्टॉप अंतर कापते आणि अहमदाबाद येथे पहाटे 4.50 वाजता थांबते. असे जरी असले तरी काही गाड्या लांब अंतर कापतात तर काही कमी अंतर कापतात. काहींचा वेग जास्त असतो तर काही रेल्वेगाड्या खूपच धीम्या गतीने धावतात.