Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजभादलवाडीत क्रुझर गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

भादलवाडीत क्रुझर गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भिगवण, (पुणे) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतुककरणाऱ्या ट्रॅक्टरला क्लुजर गाडीने पाठीमागून दिलेल्या धडकेत चारचाकी गाडीतील एकाचा मृत्यू झाला आहे. तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. भादलवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील टॉवेल कंपनी शेजारी सोमवारी (ता. 13) सकाळी ही घटना घडली.

या अपघातात अल्लाबक्ष मोहमद हनीफ बडगन यांचा मृत्यू झाला, तर कासीमसा पिरसाब मुल्ला, हुशेनबी दावलसा गुम्याड, शम्सतबरेज नबीरसुल हुंचाळ, मोहमदहुसेन नबीरसुल हुंचाळ (रा. तादीकोट, जि. विजापूर, कर्नाटक) हे जखमी झाले आहेत. हे सर्व कोची कोटा विजापूर येथील रहिवाशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने क्रूझर गाडी निघाली होती. यावेळी भादलवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील टॉवेल कंपनी शेजारी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला क्रूझर गाडी चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातांमध्ये एकाचा मृत्यु झाला, तर इतर चार गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच डाळज येथील महामार्ग मदत केंद्रातील पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना पुढील उपचारासाठी भिगवण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वारगड करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments