Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजभाडेकरूच्या सदनिकेला दुसरे कुलुप लावल्याने घरमालकावर गुन्हा दाखल

भाडेकरूच्या सदनिकेला दुसरे कुलुप लावल्याने घरमालकावर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भाडेकरूला कोणतीही माहिती न देता कुलूप लावून सदनिके मध्ये राहण्यास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदनिका मालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वकील धम्मपाल होके यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी येथील गजानन रासकर यांच्या सदनिकेमध्ये मध्ये धम्मपाल होके जुलै २०२३ पासून भाड्याने रहात आहेत. रविवारी (दि.१६) होके व कुटुंबीय घराच्या बाहेर गेले असताना रासकर यांनी कुलुपावर कुलूप लावले होते.

याबाबतची माहिती रात्री समजल्यानंतर घरात संसार उपयोगी साहित्य असताना कोणतीही माहिती न देता कुलूप लावून सदनिके मध्ये राहण्यास अडथला निर्माण केल्याप्रकरणी होके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रासकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments