Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजभाडेकरारावर घर, त्यात मेफेड्रोनचा साठा

भाडेकरारावर घर, त्यात मेफेड्रोनचा साठा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – दिल्लीत मेफेड्रोनचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेला साठा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सुनील बर्मन याने दिल्लीत भाडेतत्त्वावर घर घेतले होते. घर घेण्यासाठी त्याला मदत करणारा प्रॉपर्टी एजंट आणि बर्मनची समोरसमोर चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुवारी (ता. २९) पोलिसांनी न्यायालयास दिली.

अमली पदार्थांची निर्मिती आणि विक्री प्रकरणी पुणे पोलिसांनी बुधवारी (ता. २८) सुनिलचंद्र बिरेंद्र बर्मन (वय ३५, रा. कुचबिहार, पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक झाली आहे. बर्मन आणि यापूर्वी अटकेत असलेले कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अर्थकम लॅबोरटीज कंपनीचे मालक भीमाजी ऊर्फ अनिल परशुराम साबळे (वय ४५) आणि अभियंता युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४०) यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

साबळे आणि भुजबळ हे दोघेही उच्चशिक्षित असून, त्यांनी महाराष्ट्रासह देशात इतर किती ठिकाणी व किती व्यक्तींना मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला विकला आहे. तसेच फॉर्म्युल्यातून किती ठिकाणी मेफेड्रोन विक्रीचे कारखाने तयार झाले आहेत, याचा तपास करायचा आहे. मात्र आरोपी तपासास सहकार्य करीत नाहीत, असे या गुन्ह्याचे तपास अधिकारी अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी न्यायालयास सांगितले.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करून आत्तापर्यंत दिल्ली, सांगली आणि पुणे येथे छापा टाकून तीन हजार ६०० कोटी रुपयांचे एक हजार ८३७ किलो ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले आहेत.

बर्मनचा इतर आरोपींशी होता संपर्कात –

बर्मन याचा दिल्ली येथील आरोपी संदीप कुमार, दिवेश मुथानी, संदीप यादव, देवेंद्र यादव व पुणे येथील आरोपी हैदर शेख व पप्पू कुरेशी यांच्याशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या मदतीने पाहिजे आरोपी यांचा शोध घ्यायचा आहे. तसेच अटक आरोपींना यांच्याकडे समोरासमोर तपास करून व्यवसायाकरिता कुणी आर्थिक मदत केली. आरोपींनी अमली पदार्थातून मिळालेले पैसे कोणत्या कारणासाठी वापरले आहेत.

याबाबात त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन तपास करायचा आहे. त्यासाठी भुजबळ व साबळे यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील पल्लवी काशीद यांनी केला. न्यायालयाने साबळे आणि भुजबळ यांना ४ मार्च तर बर्मन याला नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

रिमांडची कारणे सारखीच – बचाव पक्ष

आरोपींचे वकील अॅड. पुष्कर दुर्गे यांनी भुजबळ आणि साबळे यांच्या पोलिस कोठडीला विरोध केला. आर्थिक बाबींच्या तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आवश्यक असलेले कागदपत्रे पोलिसांकडे जमा करण्यात आलेले आहेत.

तसेच पोलिसांनी ज्या कारणांसाठी पोलिस कोठडीची मागणी केली तीच कारणे मागील रिमांडमध्ये देखील होती, असे अॅड. दुर्गे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अॅड. दुर्गे यांना अॅड. आदित्य कुरुंजाळे, अॅड. रोहित जोशी, अॅड. राकेश उत्तेकर यांनी मदत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments