Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजभाटघर व निरा देवघर धरणांवर विद्युत रोषणाई, स्वातंत्र्य दिनानिमित्त धरण तिरंगा रोषणाईनं...

भाटघर व निरा देवघर धरणांवर विद्युत रोषणाई, स्वातंत्र्य दिनानिमित्त धरण तिरंगा रोषणाईनं नटलं

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भोर : केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत भोर तालुक्यातील भाटघर व निरा देवघर धरणांना तिरंगा झेंडा लावून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात स्वातंत्र्यदिन उत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

याच अनुषंगाने भोर तालुक्यातील या दोन्ही धरणांना तिरंगा झेंड्याची विद्युत रोषणाई करून सजवण्यात आले आहे. या अभियानाला पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबरजी डूबल यांचे मार्गदर्शन लाभले. या अभियानामुळे धरण परिसरात देशभक्तीची लाट उसळली. नागरिकांनीही आपापल्या घरांवर तिरंगा झेंडा लावून देशप्रेम व्यक्त केले. यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करण्याची संधी मिळाली, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments